आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंकू लावल्याने मुस्लिम असण्यावर फरक नाही - अभिनेत्री सना शेखने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सना अमीन शेख, टीव्ही अभिनेत्री. खरे नाव सना असले तरी ती घरोघरी ‘आराध्या’ नावानेच ओळखली जाते. एका मालिकेत तिच्या भूमिकेचे ते नाव आहे. त्यात ती विवाहित मराठी स्त्री आहे. भूमिकेनुसार तिला कुंकू लावून मंगळसूत्र घालावे लागते. सनाने काही दिवसांपूर्वी मालिकेच्या शूटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर काही मुस्लिम कट्टरपंथीयांनी मेसेज पाठवून कुंकू न लावण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या कॉमेंट्स होत्या... तू एक मुस्लिम आहेस, मग कुंकू का लावतेस? तुझा आवाज छान आहे, पण तुझ्या भाळी कुंकू शोभत नाही... प्रत्येक मुस्लिम महिलेने आपल्या धर्माचा सन्मान केला पाहिजे, मग ती अभिनेत्री का असेना. काम आटोपून घरी गेल्यानंतर कुंकू पुसायला हवंच.. आता या प्रश्नांना सनाने सोशल मीडियावर खणखणीत उत्तर दिले आहे. ते तिच्याच शब्दांत...

मला काही जण प्रश्न करत आहेत की, शूटिंग आटोपून घरी गेल्यानंतरही तू कुंकू का लावतेस... तू मंगळसूत्र का घालतेस? त्यांना मी सांगू इच्छिते की जेव्हा मी केस धुते तेव्हा ते कुंकू मिटले जाते. मी माझ्या आवडीचे काहीही घालेन, करेन. त्याचा माझ्या मुस्लिमतेवर परिणाम होईल, असा अर्थ होत नाही. माझी आई आणि तिची आई दोघीही मंगळसूत्र घालतात. ते सौभाग्याचे प्रतीक आहे.

यामुळे त्यांची मुस्लिमता उणी होते का...? मेसेज पाठवणाऱ्यांशी मी थेट पंगा घेतेय, याची मला पुरेपूर जाणीव आहे. मात्र, अाज त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. जे कट्टर मुस्लिम माझ्यावर टीका करत आहेत ते इन्स्टाग्राम व फेसबुक का सोडत नाहीत...? हे मनोरंजन नाही का? ते टीव्हीवर तिची मालिका का बघतात, हे हराम (निषिद्ध) नाही का? कुंकू लावल्याने अल्लाह तिला नरकात पाठवेल? आणि तुम्ही जन्नतमध्ये जाल? फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर मनोरंजनाच्या साधनांवर वेळ वाया घालवून तुम्हाला वाटतं का तुम्ही खराेखरच जन्नतमध्ये जाल...? अन् मला इथे सल्ले देत बसले आहेत.

सोशल मीडिया : तू फक्त आराध्या आहेस
या पोस्टनंतर नेटकऱ्यांचा सनाला पाठिंबा मिळत आहे. एकाने लिहिले..धर्म ही खासगी बाब आहे, कुणीही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये. दुसऱ्याने लिहिले - सना आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू योग्य आहेत, तू फक्त लोकांची आराध्या आहेस. एका युजरनुसार, आम्ही अल्लाहला मानतो, देवालाही. फक्त भारतच असा देश आहे. यामुळे सर्वांचा मान राखणे हा आमचा धर्म आहे.
बातम्या आणखी आहेत...