आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kya Super Cool Hai Hum, Censor Cut Intimate Scene

‘क्या सुपर कूल हैं हम’मधील तीन सीन्सना सेन्सॉरची कात्री; एकता संतापली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या वर्षी ‘द डर्टी पिक्चर’ने रुपेरी पडद्यावर बुम्बाट यश मिळवले. या चित्रपटाची निर्मिती करणारी एकता कपूर सध्या भलतीच नाराज झाली आहे. रितेश देशमुख आणि तिचा भाऊ तुषार कपूर असलेल्या ‘क्या सुपर कूल हैं हम’ या चित्रपटातील तीन सीन्सना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. मी जे करते ते वाईटच का असते, असा सवाल तिने सेन्सॉर बोर्डाला केला आहे.
गेल्या वर्षी एकताने निर्मिती केलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ने बॉक्स ऑफिसवर भन्नाट कमाई केली होती. तसेच या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारदेखील मिळाले. चित्रपट हिट झाल्यानंतरदेखील या चित्रपटाचा वाद कायम होता. काही महिन्यांपूर्वी ‘डर्टी’ छोट्या पडद्यावर प्रसारित करण्यात येणार होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले होते. हा चित्रपट खरच ‘डर्टी’ असल्याने रात्री 11 नंतर या चित्रपटाचे प्रसारण करावे असे न्यायालयाने म्हटले होते. तसेच या चित्रपटाच्या प्रसारणावरून अनेक महिला संघटनांनी मोर्चे काढले होते. आता एकताचा ‘क्या सुपर कूल हैं हम’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना सेन्सॉर बोर्डाने यामधील तीन सीन्सना कात्री लावली आहे. याबाबत एकताने म्हटले की, मी जे काही चित्रपट करते ते अश्लीलच का असतात? मात्र सेन्सॉर बोर्डाला दुस-यांचे चित्रपट अश्लील वाटत नाहीत.
अनुराग कश्यपच्या नुकत्याच प्रदर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्ये अनेक असभ्य संवाद आणि अश्लील दृश्ये आहेत. मात्र त्यांना कात्री लावण्यात आली नाही. बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट कात्री न लावता प्रदर्शित करण्यात येतात याकडेही तिने लक्ष वेधले. 27 जुलैला प्रदर्शित होणा-या ‘क्या सुपर कूल हैं हम’ मध्ये रितेश देशमुख व तुषार कपूर यांची प्रमुख भूमिका आहे.