आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Labrotary Set Up At Ashramschool : Rajendra Gawit

आश्रमशाळांमध्ये प्रयोगशाळा उभारणार : राजेंद्र गावित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळाच नसल्याने माध्यमिक स्तरावरील विज्ञानाचे शिक्षण अपुरे राहते. मात्र, आता या विद्यार्थ्यांचे प्रयोगशाळेचे स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हे आहेत. आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी आश्रमशाळेत प्रयोगशाळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव विभागाच्या सचिवांकडे पाठवला असून तो लवकरच मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्यात येईल.

राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रचंड खर्च करते. अर्थसंकल्पातही ब-यापैकी तरतूद केली जाते. मात्र, हा पैसा आदिवासी मुलांपर्यंत पोहोचत नसल्याचेच आजवर दिसून आले आहे. आश्रमशाळेत पुरेसे निवासस्थान नसणे, चांगली शौचालये नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे या मूलभूत गोष्टींबरोबरच शिक्षणाबाबतही आश्रमशाळांमध्ये दुरवस्था दिसून येते.

राज्यात 1100 आश्रमशाळा आहेत. त्यापैकी 552 शासकीय तर 556 खासगी (अनुदानित) आहेत. या आश्रमशाळांमध्ये जवळजवळ चार लाख विद्यार्थी राहतात. शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यासाठी 2005 मध्ये निर्णय घेण्यात आला होता, परंतु अजूनही त्याबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असे गावित म्हणाले.

औरंगाबादेत स्पर्धा परीक्षा केंद्र
आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करता यावी यासाठी औरंगाबाद, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभी करावीत यासाठी ‘यशदा’ला निधी दिला असल्याचे गावित म्हणाले.