आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणहून भारतात आली शौक पूर्ण करायला, ही लेडी चालवते 370 Kg वजनी बाईक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणी लेडी डॉ. मारल याजरलू... - Divya Marathi
इराणी लेडी डॉ. मारल याजरलू...
पुणे- हार्ले डेविडसनचे नाव ऐकताच एक भारदास्त बाईक आणि त्याला चालवणारा 'मॅचो मॅन' ची प्रतिमा डोळ्यासमोर तरळते. मात्र, काळासोबत आता ट्रेंड ही बदलत आहेत. कधी पुरुषांची पसंत राहिलेली ही हेवी बाईक आता महिलाही खरेदी करत आहेत. अशीच एक पुणे बेस्ड इराणी लेडी बाईकर सध्या चर्चेत आहे. 370 किलोची 800 सीसी BMW GS चालविणारी ही लेडी सध्या 7 खंडाच्या मिशनवर निघालेली आहे. इराणमध्ये नाही परवानगी मग इंडियात येऊन पूर्ण केला शौक...
 
- डॉक्‍टर मारल याजरलूचा जन्‍म इराणमध्ये झाली व तेथेच ग्रो झाली. सुमारे 15 वर्षापूर्वी ती पुण्यात आली आणि 6 वर्षापासून बाईकिंग करत आहे. 
- खरं तर तिने भारतात आल्यानंतर बाईंकिंग सुरु केले. कारण, इराणमध्ये महिलांना गाड्या चालविण्याची परवानगी मिळत नाही.
- मार्केटिंगमध्ये एमबीए असलेली 35 वर्षाची याजरलूजवळ पीएचडीची सुद्धा डिग्री आहे. मागील 11 वर्षापासून एका कंपनीत एक रीटेल आणि मार्केटिंग हेड काम करत आहे. मात्र, या इराणी लेडीला एक लाख किमीचा प्रवास करून विक्रम बनवायचा आहे.
 
प्रवासात अनेक अडचणींना सामना करावा लागला- 
 
- इराणी लेडी सध्या 7 खंडातील 45 देशांत फिरण्याच्या मिशनवर आहे. ज्यात बाईकवरूनच ती सुमारे 1 लाख किमीचे अंतर कापणार आहे.
- तिचे हे मिशन 15 मार्चला सुरु झाले आहे. आतापर्यंत तिने म्यानमार, थायलंड आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन आली आहे. सध्या ती पेरू देशात आहे. या दरम्यान तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. खासकरून खराब हवामान, वातावरण आणि कठिण मार्ग त्रासदायक ठरले.
 
लहानपणापासूनच बाईक चालविण्याची क्रेज-
 
- मारलच्या माहितीनुसार, "मी लहानपणापासूनच बाईक चालविण्याबाबत क्रेजी राहिली आहे. यासाठी माझी माझ्या दोन भावासोबत कायमच भांडणे व्हायची. असे असूनही मी बाईक शिकले."
- 2012 मध्ये तिने एक फॅशन ब्रॅंड लाँच केला आहे. या मिशनवर परत येताच ती एक फॅशन शो सुद्धा करणार आहे.
- सोबतच ती एक मिशन राबविणार आहे ज्या देशात महिलांना बाईक चालविण्यास बंदी आहे. तेथील कायदा बदलावा यासाठी हे मिशन चालविणार आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मारलचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...