आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या अंत्यसंस्कारासाठी ती आली भारतात, पण तिचाही करावा लागला अंत्यविधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- अमेरिकेत आपल्या पतीसमवेत राहणारी एक महिला आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी भारतात आली. आपल्या आईच्या मृत्यूचे दुख: सहन न करु शकलेल्या या महिलेने स्वत:च एका इमारतीच्या 27 व्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला. त्यामुळे आई आणि मुलीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ उपस्थितांवर आली.

काय आहे पूर्ण प्रकरण
- मुळच्या पुण्याच्या असणाऱ्या हेतल (वय 37) चे लग्न ठाण्यातील धीरज परमार यांच्यासोबत झाले होते.
- धीरज हे अमेरिकेत संगणक अभियंते आहेत. हेतल ही आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहत होती.
- हेतलची आई पुण्यात राहत होती. आजाराने तिचे निधन झाले होते. हेतल यांना त्यांच्या भावाने आईचे निधन झाल्याचे कळविले होते.
- हेतल आईच्या मृत्यूमुळे तणावाखाली होती. हे दुख: सहन न झाल्याने तिने 27 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

एकाच वेळी आई-मुलीवर अंत्यसंस्कार
हेतलच्या भावाने सांगितले की हेतल आल्यानंतरच त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
- हेतल मुंबई विमानतळावर पोहचली. त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला होता. त्यानंतर तिच्या मृत्यूचीच बातमी आली.
- आईच्या अंत्यसंस्कारसाठी आलेल्या हेतलवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ उपस्थित व्यक्तींवर आली. 
बातम्या आणखी आहेत...