आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वीला असताना पाहिले IPS होण्याचे स्वप्न, 22 व्या वर्षी केले साकार, अशा आहेत मेरीन जोसेफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SP मेरीन जोसफ (IPS) - Divya Marathi
SP मेरीन जोसफ (IPS)
मुंबई - अवघ्या 27 वर्षांच्या मेरीन जोसफ केरळ कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, त्यांची निवड वयाच्या 22 व्या वर्षी झाली होती. सहावीला असतानाच आपण एक आयपीएस अधिकारी होणार असे स्वप्न त्यांनी पाहिले आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली. शाळेत असतानाच नोट्स काढणे आणि त्याचवेळी अभ्यास करत राहणे यामुळेच आपला सराव झाला आणि पहिल्या प्रयत्नातच आयपीएससाठी पात्र ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचवर्षी बढती घेऊन त्या पोलीस महानिरीक्षक झाल्या आहेत. तसेच कमांडंट ऑफ केरळ सशस्त्र पोलिस बटालियन-2 मध्ये कार्यरत आहेत. या पोस्टवर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आयपीएस आहेत. 
 

- मेरीन जोसफ यांचा जन्म केरळमध्येच झाला. 2 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचा विवाह झाला. केरळचे रहिवासी असलेले मानसोपचार तज्ञ डॉ. क्रिस अब्राहम असा त्यांच्या पतीचा परिचय आहे.
- मेरीन यांचे वडील कृषी मंत्रालयात प्रमुख सल्लागार आहेत. तर आई अर्थशास्त्र विषयाच्या टीचर आहेत. 
- मेरीन ने दिल्ली के सेंट स्टीफंस कॉलेज से बीए ऑनर्स और MA हिस्ट्री की डिग्री हासिल की।
- 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्ना यश गाठले.
 
 
परेड कमांड करणाऱ्या सर्वात कमी वयाच्या महिला IPS
- 2016 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडला कमांड करणाऱ्या त्या देशातील सर्वात कमी वयाच्या महिला आयपीएस ठरल्या आहेत. 
- मेरीन यांना वाचनाचा छंद आहे. कुठेही गेल्या असताना त्या बॅग भरून पुस्तके खरेदी करतात. 
- त्यांच्या मते, जे लोक खेळापासून दूर असतात त्यांना सुरुवातीला ट्रेनिंगमध्ये अडथळे येतात. मात्र, दैनंदिन सराव आणि कसरत केल्यानंतर शरीराला सवय आपो-आप लागते. 
- त्या 24 तास आपल्या ड्युटीसाठी आणि आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी उपलब्ध असतात. 
 

अशी झाली ट्रेनिंग
- त्यांची ट्रेनिंग हैद्राबादच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकादमीत झाली.
- मेरीन जोसफ यांनी याच ठिकाणी शस्त्र चालवणे आणि पोहण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. 
- यासोबतच दूरवरच्या भागांत राहणे, पायपीठ करून लांबचा प्रवास गाठणे आणि धावणे त्यांनी येथेच शिकले आहे. 
- आजही त्या पहाटे 4.45 वाजता उठून दररोज 4-5 किलोमीटर रनिंग करतात. 
- घोड्यांची स्वारी करणे, शस्त्र चालवणे, स्विमिंग करणे आणि समुद्रात खोलवर डायविंग करणे त्यांना पसंत आहे. 

पुढील स्लाईड्सवर पाहा... आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...