आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Teacher Locked School Children, Reseason Was Minor

मुलांना शाळेत कोंडून मास्तरीणबाई घरी!,क्षुल्लक कारणावरून शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मालाड येथील एनएल शाळेतील दोन चिमुरड्यांना तब्बल साडेतीन तास शाळेच्या स्टोअर रूममध्ये डांबून ठेवण्याची क्रूर शिक्षा एका शिक्षिकेने दिली. त्यावर कहर म्हणजे आपणच दिलेली शिक्षा विसरून ही शिक्षिका चक्क घरी निघून गेली. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी होत आहे.


एन. एल. स्कूल या शाळेतील गुजराथी माध्यमाच्या एका शिक्षिकेने दुपारी तीनच्या सुमारास शाळेच्या मैदानावर खेळणाºया गणेश (9) आणि रीतू (13) यांना स्टोअर रूममध्ये कोंडून ठेवले. दोघेही दोरीवरील उड्या खेळत असताना पहिलीतील मुलगा पडला म्हणून दोघांनाही शिक्षा देण्यात आली. मात्र या दोघांना कोंडल्याचे विसरून ही शिक्षिका चक्क घरी निघून गेली.


संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या शाळेतील खेळाचे शिक्षक स्टोअर रूम बंद करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ही मुले भेदरलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी दोघांची सुटका केली. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांनी शिक्षिकेला ओळखताच शिक्षिकेला अटक केली जाईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.