आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laid Foundation Of Ambedkar Memorial On Mahaparinirvan Din Athawale

महापरिनिर्वाणदिनी आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करा, अाठवले यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारावयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पायाभरणी महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी करण्यात यावी, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

इंदू मिल जमिनीवरील प्रस्तावित स्मारक रखडलेले आहे. मिलची जमीन अद्याप केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या ताब्यात आहे. ती तातडीने राज्य शासनाने ताब्यात घ्यावी. तसेच राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी केली.

राज्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या खटल्यांचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. जवखेडे प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवण्यात यावा. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना नेमण्याची विनंतीही आठवले यांनी केली आहे.
'रिपाइं'ला केंद्रात मंत्रिपद देण्याचे अमित शहा यांनी मला लेखी दिले आहे. त्यामुळे रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच न्याय मिळेल. मला डावलणार नाहीत, असेही आठवले म्हणाले.