आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लॅक्मे फॅशन वीक 'मधून घडणार भारतीय प्रगतीचे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय फॅशन उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यात अग्रेसर ठरलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक ला उद्यापासून मुंबईच्या 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये सुरुवात होत आहे. फॅशन क्षेत्रातील अनेक दिग्गज आपापल्या वेगवेगळ्या 'थीम्स'(कल्पना) सह 26 मार्चपर्यंत चालणार्‍या या फॅशन वीकमध्ये आपल्या कलाकृती सादर करणार आहेत. 22 ते 26 मार्चदरम्यान सकाळी 11 ते रात्री 10.30 पर्यंत देशातील 87 डिझायनर्स आपापले कौशल्य सादर करणार आहेत.

लॅक्मे फॅशन वीक ची वैशिष्ट्ये :

तरुण तहिलियानी यांच्या हस्ते उद्घाटन : भारतातील नामांकित व अतिशय प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक मुख्य नाव तरुण तहिलियानी. टायग्रे ब्लान्कसाठीच्या एका दिमाखदार ऑफ-साइट शोद्वारे तरुण तहिलियानी यांच्या हस्ते लॅक्मे फॅशन वीक समर/रिसॉर्ट 2013 चे उद्घाटन होईल. आपल्या महान ऐतिहासिक संस्कृती व परंपरेपासून प्रेरणा घेऊन आधुनिकतेचा एक नवा आविष्कार घडवणारे अनोखे डिझाइन्स हे तरुण तहिलियानी यांच्या फॅशन स्टाइलचे वैशिष्ट्य आहे. त्यांची फॅशन म्हणजे, भारतीय दिमाख व वस्त्रकलेचा सुरेख संगम आहे.

लॅक्मेचा महाअंतिम सोहळा : एलएफडब्ल्यू समर/रिसॉर्ट 2013 च्या ग्रँड फिनाले डिझायनर असतील भारतातील विख्यात फॅशन व्हिजनरी नम्रता जोशीपुरा. भारतातील सर्वोत्कृष्ट फॅशन नैपुण्यांना वाव देण्याची लॅक्मे फॅशन वीकची वचनबद्धता यामधून दिसून येते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये जोशीपुरा यांचे पहिले शोकेस हे या सोहळ्याचे खास आकर्षण असेल.

टॅलेंट बॉक्स : ऑगस्ट 2011 मध्ये टॅलेंट बॉक्स या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. युवा, उदयोन्मुख डिझायनर्ससाठी मुद्दाम हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. मिनी प्रिह्यू शोज्च्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेल्या टॅलेंट बॉक्समध्ये यंदा 19 डिझायनर्स सहभागी होत आहेत. खास आकर्षण म्हणजे, टॅलेंट बॉक्सचे उद्घाटन विख्यात फॅशन डिझायनर अनुपमा दयाल यांच्या हस्ते होणार आहे.

फॅशन विश्वातील दिग्गजांची आवर्जून उपस्थिती : मनीष मल्होत्रा, नरेंद्र कुमार, अर्जुन खन्ना, अनुपमा दयाल, विक्रम फडणीस, रॉकी एस हे फॅशन दुनियेतील दिग्गज एलएफडब्ल्यू एसआर 2013 मध्ये आवर्जून उपस्थित असतील. इतकेच नव्हे, तर आपली समर/रिसॉर्ट कलेक्शन्सदेखील सादर करतील.

यू-ट्यूब : एलएफडब्ल्यूच्या ऑफिशियल यू-ट्यूब चॅनेलवर एलएफडब्ल्यू टीव्हीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. लॅक्मे फॅशन वीक समर/ रिसॉर्ट 2013मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील लक्झरी फॅशनचे पदार्पण होत आहे. आंतरराष्ट्रीय डिझायनर नईम खान आपली खास, अनोखी डिझाइन भारतात पहिल्यांदाच सादर करणार आहेत. यामध्ये एलएफडब्ल्यू एसआर 2013 साठी त्यांनी खास डिझाइन केलेल्या काही फॅशन्सचाही समावेश असेल.