आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षे डेट केल्यानंतर त्याने केले अभिनेत्रीबरोबर केला विवाह; आता सोबत राहते दुसरी पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिती आणि लकडवाला यांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला आहे. - Divya Marathi
आदिती आणि लकडवाला यांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला आहे.
मुंबई- आपले वजन कमी करण्यासाठी राजकारण्यांपासून बॉलीवूडच्या व्यक्तीपर्यंत सर्वच जण त्यांच्याकडे हजेरी लावतात. डॉक्टर मुफ्फजल लकडवाला असे त्यांचे नाव आहे. प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्याकडून वजन कमी करण्याच्या टीप्स घेतल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. डॉक्टर लकडवाला यांनी आदिती गोवित्रीकर यांना 7 वर्षे डेट केल्यानंतर त्यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर त्यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी प्रियंका कौल यांच्याशी विवाह केला असून सध्या ते तिच्यासोबत राहत आहेत. 
 
असे आहे डॉक्टर लकडवाला यांचे वैवाहिक जीवन
- लकडवाला यांनी आदिती गोवित्रीकर यांना 7 वर्षे डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले.
- त्यांचे वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी लग्नानंतर 11 वर्षांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला.
- लकडवाला आणि आदिती यांना 3 मुले आहेत. ती लकडवाला यांच्यासोबत राहतात. प्रियंका कौल या लकडवाला यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. सध्या ते मुंबईत राहतात.  
 
डॉक्टरकी सोडून आदिती झाली अॅक्टर
- आदिती गोवित्रीकर या डॉक्टर असून त्यांनी एमबीबीएस केले आहे. अभ्यास करतानाच त्यांनी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
- ग्लेडरेग्स मेगा मॉडल स्पर्धेच्या 1996 मध्ये त्या विजेत्या ठरल्या होत्या. 
- गोवित्रीकर यांना 1997 मध्ये बेस्ट बॉडी अॅन्ड बेस्ट फेस पुरस्कार मिळाला. 2001 मध्ये त्यांनी मिसेस वर्ल्ड पुरस्कार जिंकला.
- आदिती यांनी पहेली आणि धुंध या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
 
नेते आणि अभिनेते असे सगळेच येतात डॉ. लकडवाला यांच्याकडे
- बॉलीवूड अभिनेते आणि राजकीय नेते असे सगळेच लकडवाला यांच्याकडे वजन घटविण्यासाठी येतात. केद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, माजी मंत्री नितीन राऊत आणि व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्याकडे जाऊन वजन घटवले आहे.  
- जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती असणाऱ्या इमान अहमद हिच्यावरही डॉ. मुफ्फजल लकडवाला यांनी मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते.
- इमान ही 25 वर्षापासून बेडवरुन उठू शकली नव्हती आणि स्वत:च्या हाताने जेवणही करु शकली नव्हती.
- लेखिका शोभा डे यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या नीमच येथील पोलिस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावरही डॉ. लकडवाला यांनी उपचार केले होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...