आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबाग राजाच्या ‘दरबारा’त पोलिसांची युवतीला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील ‘लालबागच्या राजा’च्या दरबारात महिला पोलिसांनी एका तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. मीरा रोड येथे राहणारी तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. दर्शनासाठी बराच वेळ रांगेत उभ्या असलेल्या तरुणीने व्हीआयपी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिला पोलिसांनी या तरुणीला घेरून मारहाण केली.
मारहाण केल्यानंतर पोलिसांनी तरुणीलाच बाराशे रुपयाचा दंडही ठोठावला. लालबाग राजाच्या दरबारात अशी घटना होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना येथे घडल्या आहेत.
दोन दिवसांत चौकशीचे आदेश गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी याप्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांना दिले आहेत. अहवाल आल्यानंतर महिला पोलिस दोषी असतील तर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले.