आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागचा राजा यंदा घुबडावर विराजमान, भक्‍तांमध्‍ये शुभ-अशुभाची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवसाला पावणारा लालबागचा राजा यंदा घुबडावर विराजमान झाल्‍यामुळे गणेश भक्‍तांमध्‍ये शुभ- अशुभाची चर्चा सुरू आहे. लालबागच्या राजाचे गुरुवारी मुखदर्शन झाले. त्यानंतर गणेशभक्तांमध्ये या मुर्तीच्‍या मागे असलेले घुबड चर्चेचा विषय ठरले आहे. घुबडाला लक्ष्मीमातेचे वाहन मानले जाते, तरीही समाजात घुबडाकडे पाहण्याच्या नकारात्‍मक दृष्टिकोन दिसून. घुबडाविषयी लोकांच्‍या मनात विविध गैरसमज आढळतात. घुबड घरावर बसले म्‍हणजे, त्या घरावर आपत्ती कोसळणार असे मानले जाते. काही समाजांमध्‍ये घुबडाचे नाव उच्‍चारणेही चुकीचे मानले जाते. घुबड या पक्षाविषयी लोकांच्‍या मनात असलेले गैरसमज, घुबडाचे पर्यावरणातील महत्‍त्व, मुर्तीमधील घुबडाचा कोणता अर्थ घ्‍यावा आदी बाबी आम्‍ही आपल्‍या या संग्रहात सांगत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अंधश्रद्धेपोटी लोक घरात शिंपडतात घुबडाचे रक्‍त, व्‍यावसायिकांमध्‍ये काय आहे गैरसमज, पर्यावरणप्रेमी काय म्‍हणतात, लालबागच्‍या राज्‍याच्‍या मूर्तीतून काय बोध घ्‍यावा..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...