आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लालबागचा राजा\'चेे 1934 पासून ते आतापर्यंतचे PHOTOS, पाहा कसे बदलत गेले रुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकता असावी, ह्या मुळउद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

आज, 5 सप्टेंबर गणेश चतुर्थी. महाराष्‍ट्राचे आराद्य दैवत गणरायाचे आज आगमन होणार आहे. घरा-घरात तसेच बहुसंख्य सार्वजनिक गणेश मंडळाद्वारा गणपतीची स्थापना केली जाते. गणेशोत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक उत्सवात सहभागी होतात.

गणेशोत्सवादरम्यान सर्वात जास्त चर्चा असते ती मुंबईतील प्रतिष्ठीत गणपती 'लालबागचा राजा'ची. सर्वाधिक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात आणि नवस करतात. गणेश चतुर्थीनिमित्त आम्ही आपल्यासाठी लालबागच्या राजाचे 1934 पासून ते आतापर्यंतचे दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहे.

लालबागच्या राजाची सुरुवात 1934 पासून...
- लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती आहे.
- गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत आहे.
- लालबागच्या राजाची स्थापना इ.स. 1934 साली करण्यात आली.
- सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला.
- तत्कालीन नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली.
- 1934 साली होडी वल्हवणार्‍या दर्यासारंगाच्या रुपात 'श्री'ची स्थापना झाली. येथूनच 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली आहे.

गणेशोत्सवातून समाजप्रबोधन....
इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटले की, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 1934 पासून ते 2015 पर्यंत 1934 पासून ते 2015 पर्यंतचे दुर्मिळ PHOTOS...

(टीप: लालबागचा राजाचे काही फोटो उपलब्ध होऊ शकलेली नाहीत.)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...