आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Daughter Karima And Gaurav Burman Marriage

ही आहे ललित मोदींची मुलगी, अब्जाधीश पतीसोबत राहिली भाड्याच्या घरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे माजी आयुक्‍त ललित मोदी यांचा 29 नोव्‍हेंबरला वाढदिवस आहे. नेहमी वादात राहणाऱ्या ललित मोदींचे खासगी आयुष्यही अनेक वादांनी घेरलेले आहे. मोदींची सावत्र मुलगी करिमा हिच्या विवाहावेळीही बराच गोंधळ झाला होता. मोदींच्या मुलीशी विवाह केल्यानंतर गौरव बर्मन यांच्याशी त्यांच्या कुटुंबीयांनी संबंध तोडले होते. त्यामुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागले होते. गौरव देशातील प्रसिद्ध उद्योग समूह डाबर इंडियाच्या प्रमुखांचा मुलगा आहे.
नेमका काय आहे वाद ?
गौरव बर्मन यांच्या विवाहावेळी बराच गदारोळ झाला होता. गौरव आणि करिमा यांचा विवाह दोन्ही कुटुंबांनी मिळून सर्वांच्या राजीखुशीने ठरवला होता. पण या दोघांनी ठरलेल्या वेळेआधीच कोणालाही न सांगता विवाह केला. त्यामुळे गौरवच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्यामुळे गौरवला राहण्यासाठी भाड्याने घर घ्यावे लागले होते.
गौरव बर्मन
गौरव बर्मन देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि डाबर समुहाचे मालक विवेक बर्मन आणि मोनिका बर्मन यांचा मुलगा आहे. गौरव यांचे बंधू मोहित बर्मन आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे को-ओनरही आहेत.
करीमा बर्मन
करीमा बर्मन ललित मोदींची पत्नी मीनल यांची मुलगी आहे. मीनल यांचा पहिला विवाह नायजेरियाचे उद्योगपती जॅक सागरानी यांच्याशी झाला होता. पण तो विवाह फार दिवस टिकला नाही. त्यामुळे मीनल आणि जॅकच्या घटस्फोटानंतर ललित मोदी आणि मीनल यांचा विवाह झाला होता. करिमा आणि गौरव यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, करिमा मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे PHOTOS