आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्‍या मैत्रिणीवरच जडला ललित मोदींचा जीव, वाचा \'छोटी सी लव्ह स्टोरी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदी आणि पत्नी मीनल. - Divya Marathi
ललित मोदी आणि पत्नी मीनल.
मुंबई - नेहमी वादात राहणाऱ्या आयपीएलचे माजी आयुक्‍त ललित मोदींचे खासगी आयुष्यही अनेक वादांनी घेरलेले आहे. आपल्‍या आईची जिवलग मैत्रीण असलेल्‍या मीनल यांच्‍यावर ललित जीव जडला होता. पुढे त्‍यांनी लग्‍नही केले. मात्र, याला ललित यांच्‍या घरातून प्रचंड विरोध झाला. आज (रविवार) प्रेमदिनाच्‍या अनुषंगाने divaymarathi.com सांगणार आहे. ललित आणि मीनल यांची छोटीशी लव्‍ह स्‍टोरी.
शिक्षण घेत असताना मीनलवर जीव जडला
परदेशात शिक्षण घेत असताना ललित यांचा जीव आईची मैत्रीण मीनलवर जडला होता. मीनल ललित यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी होती, तरीही दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
मीनल प्रचंड रागावली होती
मीनलने नजेरियाचा व्‍यावसायिक जॅक सागरानीसोबत लग्न केले. या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ललितने मीनलसमोर प्रेम व्यक्त करुन लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मीनल भडकली होती. तिने तब्बल चार वर्ष ललितसोबत बोलणे बंद केले होते.
...आणि अखेर एक झाले ललित-मीनल
मीनल आणि सागरानी फार दिवस एकत्र राहू शकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला ललित यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला. परंतु, ललित यांनी माघार घेतली नाही. 17 ऑक्टोबर 1991 रोजी त्यांनी लग्न केले.
सावत्र मुलीला दिले नाव
मीनलला आधीच्या लग्नातून झालेली एक मुलगी होती. तिचे नाव करिमा. ललित यांनी तिला स्‍वीकारले. तिचे लग्न गौरव बर्मन याच्यासोबत लावून दिले. डाबर ग्रुपचे मालक विवेक बर्मन आणि मोनिका बर्मन यांचा तो मुलगा आहे. गौरवचा भाऊ मोहित बर्मन किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोओनर आहे.
मुलगा मुंबईत, मुलगी स्वित्झर्लंडमध्ये
ललित आणि मीनल यांना झालेल्या मुलाचे नाव रुचिर आहे. त्यांना आलिया नावाची मुलगीही आहे. ती स्वित्झर्लंडमध्ये पदवी घेत आहे. रुचिर मुंबईत 'अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे' येथे शिक्षण घेत आहे. तो विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थचा चांगला मित्र आहे. आयपीएल पार्टीमध्येही तो बरेचदा दिसला आहे. मुलगी देखील आयपीएल सामने आणि पार्टीमध्ये दिसली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ललित मोदीचे कुटुंब...