आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्त्रीत्वा’शी संबंधित अवयवच ललिता यांच्या शरीरात नाहीत! वैद्यकीय चाचणीतून बाब उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललिता साळवे... - Divya Marathi
ललिता साळवे...

मुंबई- लिंगबदलासाठी इच्छुक असलेल्या बीड येथील ललिता साळवे या महिला पोलिस शिपायाच्या शरीरात स्त्रीत्वासाठी आवश्यक असलेले अवयवच नसल्याची बाब वैद्यकीय तपासणीतून समोर आली. सोमवारी जे.जे. रुग्णालयात ललिता यांची नव्याने वैद्यकीय तपासणी झाली. 

 

लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी साळवे यांनी केलेल्या रजेच्या अर्जावर निर्णय घेण्याच्या उद्देशाने गृह विभागाने साळवे यांच्या नव्याने वैद्यकीय तपासण्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी जे.जे. रुग्णालयात त्यांच्या विविध चाचण्या पार पडल्या. ८ डॉक्टर्सच्या पथकाने ६ तासांपेक्षा अधिक कालावधीत या चाचण्या केल्या. या तपासणीचा एक विस्तृत अहवाल तयार करून तो गृह विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

 

काय म्हटले आहे अहवालात  
अहवालानुसार ललिता यांच्या शरीरात स्त्रीत्व अधोरेखित करणारे स्त्री गुप्तांग, गर्भाशय किंवा बीजांड यासारखे अवयव अस्तित्वात नाहीत. फक्त एक अविकसित स्वरूपाचे पुरुष गुप्तांग आढळले आहे. या चाचणीतील निष्कर्ष हे ललिता यांच्या लिंगबदल शस्त्रक्रियेच्या दाव्याला पुष्टी देणारे आहेत. अहवालावर लवकरच गृह विभागाकडून निर्णय अपेक्षित आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...