आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalu Admitted In Asian Heart Instu. Hospital At Mumbai

लालूप्रसाद यादव यांच्यावर ‘एशियन हार्ट’मध्ये आज दोन ह्रदयशस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: रूग्णालयात दाखल होताना लालूप्रसाद यादव)
मुंबई- हृदयविकाराच्या त्रासामुळे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एशियन हार्ट’ रुग्णालयात दाखल झालेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांच्यावर आज दोन हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून तब्बल पाच तास ही शस्त्रक्रिया चालणार आहे.
लालूप्रसाद यांच्यावर करण्यात आलेल्या चाचण्यांनंतर त्यांच्या हृदयातील महाधमनी आकुंचन पावली असून त्यांच्यावर आज लागोपाठ दोन हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामध्ये महाधमनीतील झडपांचे प्रत्यारोपण तसेच धमनीतील अडथळ्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे ‘एशियन हार्ट’चे वैद्यकीय संचालक विजय डीसिल्वा यांनी सांगितले. कोणतीही हृदयशस्त्रक्रिया सोपी नसून आम्ही लालूप्रसाद यादव यांच्यावरील या शस्त्रक्रिया योग्य रीतीने पार पाडू, असे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले.
लालूप्रसाद यादव एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रूग्णालयात विविध तपासण्यासाठी रविवारी रात्री दाखल झाले आहेत. तेथे निष्णात डॉक्टर रमाकांत पांडा आणि त्यांची टीम लालूंवर उपचार करीत आहे. या टीमने लालूंना ह्रदयशस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. दरम्यान, लालू यांची प्रकृती स्थिर असल्याने लागलीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना मागील काही दिवसापासून रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यामुळे लालू यांनी आपली शारीरिक तपासणी करून घेण्याचे ठरविले. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांना ह्रदयशस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. लालूप्रसाद यांनी ह्रदयशस्त्रक्रिया करण्याला परवानगी दिली.
लालूप्रसाद यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुलगी मिसा, जावई मुंबईत आहेत. दरम्यान, लालूप्रसाद यादव मुंबईत दाखल झाल्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली.
पुढे वाचा, खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट...