आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंवर यशस्वी शस्त्रक्रिया: 20 डॉक्टरांचे पॅनेल अन् सहा तास चालली सर्जरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर मुंबईत बुधवारी करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दरम्यान, वेगवेगळ्या दोन शस्त्रक्रियांसाठी 20 डॉक्टरांचे पॅनेल उपस्थित होते. तसेच या शस्त्रक्रियांसाठी तब्बल सहा तास लागले. लालूंच्या महाधमनीतील वॉल्व बदलणे, त्यातील अडथळे दूर करण्यासह लालूप्रसाद यांच्या हृदयात आढळलेले 3 मिमीचे छिद्रही बुजविण्यात आल्याचे एशियन हार्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रमाकांत पांडा यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, लालूंची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना तीन-चार दिवस आयसीयूत ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांना पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत त्यांना रूग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचेही डॉ. पांडा यांनी सांगितले. सर्जरीच्या वेळी दोन बॉटल रक्त लालूंच्या शरीरात सोडण्यात आले. लालूंना पुढील दोन दिवस पाईपद्वारे श्वासोच्छवास पुरवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, लालूंच्या प्रकृतीसाठी व त्यांच्या तब्बेतत लवकर सुधार व्हावा यासाठी पाटण्यातील पक्षाच्या कार्यालयात हवन व विशेष पूजा-अर्चना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालूंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विट करताना म्हटले आहे की, लालू लवकरच ठीक होतील व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे. पाच वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही याच रूग्णालयात ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली होती.
पुढे आणखी वाचा, यासंदर्भातील माहिती...