आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन गैरव्यवहार; भुजबळांवर गुन्हा, अटक होण्याचीही शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि विभागाच्या पाच अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी संकुलातील सरकारी जमीन एका विकासकाला हस्तांतरित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकाेर्टाने डिसंेबर २०१४ मध्ये चौकशीचे आदेश दिले होते.

यांच्याविरुद्ध गुन्हे : तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, तत्कालीन कार्यकारी अभियंता हरीश पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड, तत्कालीन अवर सचिव संजय सोलंकी आणि बांधकाम विभागाचे तत्कालीन सचिव एम. एच. शहा यांच्यावरही गुन्हा दाखल केला. गायकवाड हे लातूरचे भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
या कलमांन्वये दाखल झाला गुन्हा
लोकसेवकाने केलेली गुन्हेगारी स्वरूपाची वर्तणूक, फसवणूक, खोटी कागदपत्रे सादर करणे तसेच गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि त्यात एकमेकांना साहाय्य करणे या आरोपांखाली लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले.