आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील अँटॉप हिलमध्ये दरड कोसळली; दोघांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अँटॉप हिल परिसरातील देवराम चाळीवर बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी खडक बाजूला करून दोघांची सुटका केली असून ढिगार्‍याखाली दोन मृतदेह सापडले आहेत.

वडाळाजवळील अँटॉप हिल परिसर हा दरडीच्या छायेखालील भाग म्हणून ओळखला जातो. सकाळी आठच्या सुमारास शेख मिस्त्री दग्र्याशेजारील पाच घरांवर दरड कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. त्यात संदीप रामअवतार केवट (22) आणि रामअवतार पावस केवट (45) या पितापुत्राचे मृतदेह सापडले.