आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, तीन जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरड कोसळल्याने कारमधील तिघे ठार झाले. - Divya Marathi
दरड कोसळल्याने कारमधील तिघे ठार झाले.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आडोशी बोगद्याच्या तोंडाशी दरड कोसळून रविवारी दोन जण मृत्युमुखी, तर तीन जण गंभीर जखमी झाले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाखांची मदत जाहीर केली.

या दुर्घटनेत दिलीप गोपाळ पटेल (५२, रा. भाईंदर) आणि शशिकांत धामणकर यांचा मृत्यू झाला. मंगल माने (३५), सुशीला धामणकर (६०) आणि निर्मला गोपाळ पटेल (६०) या गंभीर जखमी झाल्या.

दुपारी साडेबारा वाजता आडोशी बोगद्याजवळचा डोंगराचा भाग कोसळला. मोठ्या प्रमाणात दगडधोंडे आणि माती रस्त्यावर आदळली. याच वेळी मार्गाने जाणाऱ्या तीन गाड्या या दरडीखाली आल्या आणि जीवितहानी झाली. दरडीचा भाग दूर करण्यासाठी पोकलेन येण्यास विलंब झाल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. सायंकाळी वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली. बरीच वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधोशी येथील बोगड्याजवळ ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप मृतांची आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. कार रस्त्यावरून जात असताना मोठे दगड थेट कारवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...