आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Large Scal Money Move, 7.50 Crores Recovered Across State

निवडणुकीच्या काळात ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात, राज्यभरात साडेसात कोटी रुपये पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकीच्या काळात राज्यात ‘लक्ष्मीदर्शन’ जोरात सुरू आहे. निवडणूक तपास पथकांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत साडेसात कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा येथे पाच कोटी, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चोपडाई नाक्यावर सुमोत १ कोटींची रोकड आढळली. मंगळवेढ्यातील रक्कम बँकेची असल्याचे नंतर निष्पन्न झाले.

नागपूरच्या महाल परिसरात स्विफ्ट गाडीत ७० लाख रुपये पकडण्यात आले. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दहिसर पश्चिम येथे एका गाडीतून ५० लाख जप्त करण्यात आले. गाडीचा चालक आणि सहका-याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर जिल्ह्यात चारोटी नाक्यावर एका गाडीत १६ लाखांची रोकड पकडण्यात आली. या गाडीत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजू पारेख यांचे वडील होते.

भाजप उमेदवाराचे २० लाख जप्त
पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यात भाजपचे उमेदवार जयसिंग एरंडे यांची २० लाख ४८ हजारांची रोकड पोलिसांनी पकडली .

मंगळवेढ्यातील पाच कोटी परत:
मंगळवेढ्यात पाच कोटी रुपये पकडले. चौकशीनंतर ही रक्कम सांगोला व मंगळवेढा सोलापूर जिल्हा बँकेची असल्याचे सिद्ध झाले. ही रक्कम नंतर बँकेकडे देण्यात आली.