आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lata Mangeshkar Support To Campa Cola Buildings People, Divya Marathi

बिल्‍डरच्‍या चुकीची शिक्षा रहिवाशांना, हे अन्‍यायकारक - लता मंगेशकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरळीतील 'कॅम्पा कोला' या इमारतीतील बेकायदेशीर मजल्यांवर लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करणार असल्‍याने बेघर होणा-या लोकांच्‍या पाठीशी लता मंगेशकर उभ्‍या राहिल्‍या आहेत.
'कॅम्पा कोला' मधील नागरिकांची बाजु घेताना, 'बिल्‍डराच्‍या चुकीची शिक्षा ना‍गरिकांना नको. इमारतीमध्‍ये लहान मुले तसेच वृध्‍द असून यापूर्वीच बेघर होण्‍याच्‍या भीतीने तिघांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यांना बेघर करणे हे अन्‍यायकारक असणार आहे' असे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्‍या ट्विटरवर ट्वीट केले आहे.
महानगरपालिकेने 'कॅम्‍पा कोला' इमारतील बेकायदेशीर घरावंर हातोडा चालवून नये म्‍हणून इमारतीतील रहिवाशांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. परंतु सुप्रीम कार्टाकडूनही त्‍यांना दिलासा मिळू शकला नाही.
महापालिकेने 'कॅम्पा कोला'तील अवैध घरे रिकामी करण्‍याची नोटीस जारी केली आहे. परंतु लता मंगेशकर नागरिकांच्‍या बाजूने उभ्‍या राहिल्‍याने सरकार कोणती भूमिका घेईल याविषयी सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, लता मंगेशकरांचे ट्वीट