आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Late Shivsena Chief Balasaheb Thackeray\'s First Death Anniversary

उद्धव ठाकरे, शरद पवारांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिवंगत शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या पहिला स्‍मृतीदिनानिमित्त पक्षप्रमूख उद्धव ठाकरे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि त्‍यांच्‍या कन्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवतीर्थावर हजेरी लावून आदरांजली वाहिली. काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनेचे ज्‍येष्‍ठ नेते मनोहर जोशी यांनीही शिवाजी पार्कवर उपस्थिती लावली आहे. त्‍याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. बाळासाहेबांना मानवंदना देण्‍यासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर राज्‍यातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत आहेत. संपूर्ण शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरेमय झाला असून बाळासाहेबांच्‍या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. बाळासाहेबांच्‍या स्‍मृती जतन करण्‍यासाठी मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर बाळासाहेब स्‍मृती उद्यान उभारले आहे.

शिवसैनिकांबरोबर अनेक पक्षांचे नेतेही शिवाजी पार्कवर उपस्थित असणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्‍ण अडवाणी, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे त्‍याचबरोबर राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार, मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण ही उपस्थित राहतील.

शिवसेनाप्रमूखांच्‍या निधनानंतर शिवाजी पार्कवरील खुल्‍या मैदानात त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍याच जागी बाळासाहेबांचा हट्ट शिवसेनेने धरला होता. परंतु, शिवाजी पार्कला हेरिटेज आणि 'सीआरझेड'चे नियम लागू असल्‍यामुळे त्‍यांना स्‍मारकाचा नाद सोडावा लागला होता. त्‍यामुळे पालिकेत सत्ता असूनही शिवसेनेचे चौथ-याचेही स्‍वप्‍न धुळीस मिळाले होते. शेवटी बाळासाहेबांची चिरंतन आठवण म्‍हणून बांधकाम विरहित उद्यान उभारण्‍याचा निर्णय झाला.