आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest Marathi News BJP Leader Ship In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नेतृत्वाच्या स्पर्धेतूनच फुटीच्या बातम्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेना- भाजपसह घटकपक्षांची महायुती अभंगच आहे. भाजपमधील काही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नातून भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत’, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगिले. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेशी युती तुटणार नसल्याची ग्वाही दिली.
गेल्या काही दिवसांपासून भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच घटक पक्षही जागा वाटपामुळे नाराज असल्याच्या बातम्यांमुळेही महायुतीवर संकट निर्माण झाल्याची चर्चा अाहे. मात्र सर्वच घटक पक्षांनी या बातम्यांचे खंडन केले अाहे. िशवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांिगतले, महायुतीची जागा वाटपाची चर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून भाजपने जास्त जागांची मागणी केलेली नाही. मात्र भाजपत नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादाचा परिणाम महायुतीला भोगावा लागत आहे. भाजपतील काही नेते स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न करीत असून ते नेतेच काही वर्तमानपत्रांत अशा चुकीच्या बातम्या पेरत अाहेत. मात्र त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नसून िवधानसभा िनवडणुकांना आम्ही एकत्रच सामोरे जाणार आहोत. िशवसेना हा नेहमीच माेठ्या भावाच्या भूमिकेत असल्याने भाजपपेक्षा जास्त जागा आम्हीच लढवणार,’ असेही या नेत्याने स्पष्ट केले. चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्यांना भाजपने त्वरित समज द्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जास्त जागांची मागणी नेत्यांची : फडणवीस
याबाबत फडणवीस म्हणाले की, शिवसेनेबरोबर आमची युती गेल्या २५ वर्षांपासून आहे. यावेळी जास्त जागा लढवाव्यात अशी आमच्या काही नेत्यांची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलल्याने नेत्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही ११७ जागांचीच तयारी सुरु केली आहे. काही जागांची अदलाबदली होऊ शकते वा काही जागा इकडे-तिकडे होऊ शकतात परंतु त्याचा युतीवर काहीही परिणाम होणार नाही. आगामी निवडणुक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि घटक पक्षांचाही आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे’.
माध्यमांतील वृत्तात तथ्य नाही : तावडे
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीही, मीडियात जे येतेय त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. सर्व घटक पक्षांशी आमची बोलणी सुरु आहेत असे सांगून महायुती अभंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही महायुतीत जागा वाटपावरून कसलाही गोंधळ नसून आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही एकत्रच आहोत असे दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.