आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने १४४ जागांची मागणी केलीच नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘निम्म्या जागा लढवाव्यात, अशी भाजपमधील काही नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र आम्ही शिवसेनेकडे १४४ जागांची मागणी कधीही केलेली नाही. काहीही झाले तरी आम्ही महायुतीनेच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. आता मित्रपक्ष वाढल्याने जागा वाटपाच्या जुन्या फॉर्म्युल्याचा फेरविचार करण्याची आहे,’ असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले. आठवडाभरात उमेदवाराची पहिली यादी घोषित केली जाईल असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या निवडणूक समितीची पहिली बैठक सोमवारी पार पडली. या वेळी महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी, निवडणूक प्रभारी ओमप्रकाश माथुर, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आदी समितीतील नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठवले होते. या निरीक्षकांनी अहवाल तयार करून दिला. या अहवालावर या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. यानंतर नावांची निवड करून ती नावे दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय सांसदीय मंडळाकडे पाठवली जातील. त्यांच्याकडून नावे आल्यानंतर आम्ही पहिली यादी जाहीर करू.’
भाजपची तयारी केवळ ११७ जागांवरच
फडणवीस म्हणाले, आजच्या बैठकीत आमची ११७ जागांवरच चर्चा झाली. परंतु आम्ही सर्व जिल्ह्यातील इच्छुकांचे अहवाल मागवलेले आहेत, त्यामुळे आमच्याक़डे संपूर्ण राज्यातील मतदारसंघाचा आराखडा आहे. ‘याचा अर्थ सगळ्या जागा तुम्ही लढवण्यास तयार आहात का?’ या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आम्ही सध्या ११७ जागांवरच लक्ष केंद्रीत केलेले आहे. शिवसेनेकडे आम्ही १४४ जागांची मागणी केलेली नाही. मात्र पक्षातील अनेक नेत्यांची तशी इच्छा आहे’
यंदा ७० टक्के आमदारांनाच देणार तिकीट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी ७० टक्के आमदारांनाच पुन्हा तिकिट दिले जाईल. ३० टक्के आमदारांबाबत फेरविचार केला जात आहे. काही आमदार वयोवृद्ध झालेत, काहींनी पक्षविरोधक कारवाया केल्या तर काहींना निवडणूकच लढवायची नाही. त्यामुळे या जागी नवीन चेहऱ्याचा विचार केला जात आहे.

पुढील स्लाइडमध्ये, अमित शहा भेटणार उद्धव ठाकरेंना ?