आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना आईचे नाव लावण्याची मुभा, महिला लावू शकतील पतीऐवजी वडिलांचे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रातील महिलांना सरकारी कागदपत्रांमध्ये वडील अथवा पती यापैकी एकाचे नाव लावण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मुलेही आईचे नाव वापरू शकतील.

महिला-बालकल्याण विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, मुले आई अथवा वडील यापैकी एकाचे नाव लावू शकतील. राज्य सरकारच्या तिसर्‍या महिला धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला. महिलेला यात काही अडचण आली तर ती जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा अधिकार तिला आहे. मुले दोन्ही पालकांची अथवा दोघांपैकी एकाचे नाव लावू शकतात, असे या आदेशात म्हटले आहे.