आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Mood Of Nation, Modi Still Popular In India Survey

SURVEY: नरेंद्र मोदी आजही देशात सर्वात लोकप्रिय व सक्षम नेते, कौल एनडीएच्या बाजूने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो) - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)
मुंबई- देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. लोकप्रिय नेते म्हणून मोदींना 58 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर राहुल गांधी यांना 11 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना अनुक्रमे 4 टक्के लोकांनी सर्वात लोकप्रिय नेता असल्याचे म्हटले आहे. देशात आज निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल असा अंदाज सर्व्हेत दिसून आला आहे. आजच्या स्थितीत भाजपप्रणित आघाडीला 300 पर्यंत जागा मिळतील तर काँग्रेसप्रणित यूपीएला 100 हून अधिक जागा मिळतील असे सर्व्हेत म्हटले आहे.
20 महिन्यापूर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेत आले होते. या काळात मोदींनी निश्चितच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. काही क्षेत्रात चांगले यश मिळाले तर काहींत समिश्र. मात्र, सामाजिक व आर्थिक पातळीवर मोदी सरकारला फारसे यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत देशाच्या जनतेचा मूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूज व नेस्लन यांनी नुकताच एक सर्व्हे केला. यात वरील निष्कर्ष आले आहेत. देशभरातील 19 राज्यांतील 109 लोकसभा मतदारसंघातील सुमारे 17 हजार लोकांच्या मुलाखती घेऊन ही पाहणी केली गेली आहे. 10 जानेवारीदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे.
जनता मोदींबाबत अजूनही आशावादी-
मोदी सरकारच्या कामगिरीबाबत वेगवेगळ्या पातळ्यावर प्रश्न विचारण्यात आले. यात देशातील जनता पंतप्रधान मोदींबाबत अजून खूपच आशावादी असल्याचे दिसून येत आहे. 58 टक्के लोकांनी मोदी सर्वात लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे तर 62 टक्के लोकांनी मोदींत नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. आज देशात निवडणूका झाल्यास मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 301 जागांसह सत्तेत येईल तर काँग्रेसच्या जागा 62 वरून 108 पर्यंत वाढतील असे सर्व्हेत म्हटले आहे.
- नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस घटत चालली आहे का? या प्रश्नांवर 47 टक्के लोकांनी 'होय' असे तर 45 टक्के लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे.
- सारासार विचार करता मोदी सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? या प्रश्नांवर 57 टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने मत नोंदवले आहे.
- देशात आता निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान होईल? या प्रश्नांवर 43 टक्के लोकांनी आपण भाजपला मत देणार असल्याचे म्हटले आहे तर केवळ 14 टक्के लोकांनी आपण काँग्रेसला मतदान करू असे म्हटले आहे. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 4 टक्के मते पडतील असे सर्व्हेत म्हटले आहे.
पुढे वाचा, काँग्रेस, राहुल गांधींबाबत जनतेचे मत प्रतिकूलच...