आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्रः चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या; पतीची पत्नीला अपघाताची नुकसानभरपाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण- दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा संशयातून एका तरुणाने प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिनेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु, पोलिस चौकशीत त्यानेच हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या तरुणाचे नाव कुमार पाटील असे आहे. मिनल नावाच्या तरुणीवर त्याचे प्रेम होते. गेल्या वर्षभरापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. दोघांच्या प्रेमाला कुटुंबीयांनीही संमती दिली होती. पण गेल्या काही दिवसांपासून कुमार मिनलच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. याबाबत दोघांमध्ये अनेकदा भांडणेही झाली होती. मिनलने त्याला खुप समजवण्याचा प्रयत्न केला. पण संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले होते.
एक दिवस बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करुन कुमार तिला घेऊन एका लॉजवर गेला. त्याने तिची ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. पण मिनलच्या कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर कुमारने कबुल केले, की त्याने मिनलची गळा आवळून हत्या केली.
पुढील स्लाईडवर वाचा....
औरंगाबादच्या पत्नीची पतीकडेच रस्ता अपघाताच्या नुकसानभरपाईची मागणी
शिर्डीच्या साईंच्या बोटातून पडले पाणी... सोशल मीडियावर शेअर झाल्या पोस्ट....
ठाकरे घराण्याची कुलस्वामिनी एकविरा देविचे मंदिर ठरवले अनधिकृत
नागपुरात विधानभवनासमोरच दुचाकीस्वारांची स्टंटबाजी, पाचही तरुण जखमी
कोल्हापुरच्या रिक्षाचालकाच्या मुलाचे अनोखे लग्न... मुख्य चौकात आयोजित केला सोहळा...
मुंबईत प्रियकराने केला बारबालेचा खून... मृतदेह भीमाशंकरजवळ जाळला....
बातम्या आणखी आहेत...