आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Nitesh Rane Decide To Fight Against Bhaskar Jadhav, Divya Marathi

भास्कर जाधवांविरोधात नीलेश राणेंचे शड्डू, गुहागरमधून विधानसभा लढवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नारायण राणे व त्यांच्या मुलांचे काँगे्रसविरोधातील बंड थंड झाले असले तरी काँगे्रसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसविरोधात ऐन विधानसभा निवडणुकीत त्यांनी शड्डू ठोकले आहेत. कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून राणेंचे ज्येष्ठ चिरंजीव नीलेश यांनी राजकीय खळबळ उडवून दिली. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून राणे व त्यांचे दोन्ही मुले नीलेश व नितेश प्रचंड निराश झाले आहेत. ही निराशा राणेंनी काँग्रसेविरोधातील बंडावेळी दिसून आली होती. मात्र, आपल्या भविष्याचा विचार करून त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. पण, भास्कर जाधवांविरोधात असलेला वैयक्तिक राग राणेंनी निवडणुकीच्या निमित्ताने काढण्याचे ठरवलेले दिसते.

शनिवारी नीलेश राणेंनी जाधवांविरोधात आपण उभे राहणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, जाधवांना पैशांची मस्ती आली असून ती उतरवण्यासाठी मी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. नीलेश राणेंच्या या निर्णयाविषयी जाधव यांनी काहीएक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, जाधव समर्थकांच्या मते नीलेश यांना रत्नागिरीत कवडीची किंमत नाही. ती लोकसभा निवडणुकीत दिसली होती. गुहागरमधून त्यांनी उभे राहूनच दाखवावे त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल, असे सांगितले.

तटकरेंचा छुपा पाठिंबा?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व भास्कर जाधव यांचे फारसे चांगले संबंध नाहीत. तटकरे कायम जाधवांचे रत्नागिरीतील प्रतिस्पर्धी उदय सामंत यांना सतत पुढे करत असल्याने ही नाराज वाढत चालली आहे. याचवेळी तटकरेंचे नारायण राणेंशी चांगले संबंध आहेत. राणेंचे धाकटे चिरंजीव नितेशने एका मुलाखतीतही तटकरेंचे आमचे उत्ताम समन्वय असल्याचे सांगत तटकरे-जाधव वादाला तिखटमीठ लावले होते. आता नीलेश गुहागरमधून उभे राहणार असतील तर तटकरेंचा त्यांना छुपा पाठिंबा असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय उट्टे फेडण्याचे डावपेच!
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने निराश झालेल्या नीलेश राणेंनी आपल्या पराभवाला राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर यांच्याप्रमाणे भास्कर जाधव यांना परस्पर दोषी ठरवले आहे. राणे परिवारांच्या चुकांपेक्षा केसरकरांच्या थेट, तर जाधवांच्या अप्रत्यक्ष प्रचारामुळे आपली जागा गेली, असे नीलेश यांना वाटते. जाधव हे सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री असताना या जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद त्यांनी वाढवली. पक्षाने वेंगुर्ले, मालवण व सावंतवाडीच्या नगर परिषद निवडणुका जिंकल्या त्यात जाधवांचा मोठा वाटा होता. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी जाधवांच्या चिपळूण कार्यालयावर नीलेश समर्थकांनी हल्ला केल्यानंतर जाधव व राणे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. गेले दोन वर्षे जाधव व राणे यांच्यामधील वाद अधूनमधून उफाळून येत आहेत.