आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील भूखंडप्रकरणी अशोक चव्हाणांना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पुण्याच्या सेनापती बापट मार्गावरील रामोशी वतनाचा तीन हजार कोटी रुपये किमतीचा 102 एकरांचा भूखंड बिल्डरच्या हवाली का केला, अशी विचारणा करणारी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राज्य सरकारला बजावली. पेड न्यूजप्रकरणी आधीच अडचणीत असलेल्या चव्हाणांच्या यामुळे अडचणी वाढणार आहेत.
रामोशी समाजाच्या काही कुटुंबांना ही जमीन कसण्यासाठी वतन म्हणून देण्यात आली होती. अटी व शर्तीचा भंग झाल्याने 1951 मध्ये ही जमीन सरकारने ताब्यात घेतली होती. मात्र 2001 मध्ये जयंत शहा यांच्या मयूरेश डेव्हलपर्सने सदर भूखंड मिळवला. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.अभय ओक व न्या.ए.एस. चांदूरकर यांच्या खंडपीठाने बर्‍हाटे यांच्या याचिकेवर ही नोटीस नुकतीच बजावली आहे.