आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPDATE महाराष्ट्र: भुसावळमध्ये दोन दुचाकी पेटवल्या, वाहने पेटवून देण्याचे सत्र सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- गेल्या काही महिन्यांपासून भुसावळ शहरात माथेफिरूंकडून वाहने पेटवून देण्याचे प्रकार सुरूच आहे. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास शहरातील खडका रोडवरील पटेल कॉलनीतदेखील दोन दुचाकी जाळल्या आहेत.
 
शहरात यापूर्वी गौसियानगरात दोन दुचाकी, काझी प्लॉटमध्ये दोन दुचाकी आणि यानंतर पापानगरात रिक्षा जाळण्यात आली होती. काझी प्लॉटमध्येच एक बोलेरो गाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला होता. या सलग घटनांमागे नेमका कोणाचा हात आहे? याचा छडा अद्याप पोलिसांकडून लागलेला नाही. त्यात पुन्हा शुक्रवारी पहाटे खडका रोडवरील पटेल कॉलनीमध्ये दोन दुचाकी पेटवून देण्यात आल्या. शंकर धोबी यांच्या मालकीच्या या दोन गाड्या असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बाजारपेठ पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
 
यापूर्वीही पुणे, नाशिक औरंगाबाद या शहरांमध्ये माथेफिरुंनी वाहने जाळल्याचा प्रकार घडला आहे. औरंगाबादमध्ये वाहने जाळणाऱ्या काही माथेफिरूंना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, गेल्या मंगळवारी (13 फेब्रुवारी) पुन्हा औरंगपुऱ्यातील एसबी कॉलनीजवळ जनता बाजारसमोरील पार्किंगमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने चार कार जाळल्या होत्या. सहा महिन्यांपासून थांबलेले गाड्या जाळण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे नागरिकांमध्ये दहशत आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...