आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Girl Abused By Father Catches Him In Sting

आईचा विश्वास बसावा म्हणून, मुलीने केले दोन वर्षे शोषण करणा-या वडिलांचे स्टिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : आरोपीचा फोटो दाखवणारी पीडिता

मुंबई - शहराच्या कल्याण परिसरात 15 वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणा-या आपल्या सावत्र वडिलांचे पितळ उघडे केले आहे. स्टिंग ऑपरेशनच्या मदतीने या मुलीने या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या मुलीने मोबाईलच्या मदतीने 58 वर्षीय वडिलांच्या कारनाम्यांचा व्हिडीओच तयार केला. या पुराव्याच्या आधारे या मुलीने आईला आपल्या सावत्र वडिलांच्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडितेने मुंबईच्या एका प्रतिष्ठीत शाळेत बारापर्यंत शिक्षण घेतले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स (POSCO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कसा झाला पर्दाफाश
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचे सावत्र वडील म्हणजेच आरोप नेमका ती कॉलेजहून घरी यायच्या वेळीच जेवणासाठी यायचा. गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्याबरोबर अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न करायचा. दुपारी ते दोघेच घरात असायचे. तो आराम करण्याच्या बहाण्याने टीव्ही सुरू करायचा आणि मुलीला त्याच्याबरोबर सोफ्यावर बसवून घेऊन अश्लिल चाळे करायचा. मुलीने आईला वारंवार याबाबत तक्रारी केल्या, पण आईने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे अखेर एका दिवशी या मुलीने मोबाईल चार्जिंगला लावल्याच्या बहान्याने कॅमेरा सुरू करून ठेवला आणि व्हिडीओ शुटिंग केले.

आईने दाखवला अविश्वास
पीडितेच्या आईने पोलिसांसमोर आपल्या मुलीवर विश्वास ठेवला नसल्याचे मान्य केले आहे. ज्या व्यक्तीबरोबर आपण सात वर्षांपासून राहत आहोत, तो असे कृत्य करेल यावर तिला विश्वास बसत नव्हता. मुलीने पत्र लिहून सांगितल्यानंतरही तीने मुलीवर विश्वास ठेवला नाही.