आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्रः अनैतिक संबंधांवरुन आईनेच दिली मुलाच्या हत्येची सुपारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या मुलाची हत्या घडवून आणण्यासाठी आईनेच सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मालाड पश्चिममधील बांगुरनगरमध्ये हा प्रकार घडला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली आहे. सिसिलिया डिसुझा (54) असे या महिलेचे नाव आहे. तिने मुलगा रोनाल्ड याच्या हत्येची सुपारी दिली होती.
अशी घडली घटना
बांगुरनगर येथील पै मॅन्शन सोसायटीत राहणाऱ्या रोनाल्डची 8 डिसेंबर रोजी राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि दहा हजार रुपये रोख घेऊन हल्लेखोर घेऊन गेला होता. त्यानंतर सिसिलिया यांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती.
अशी अडकली पोलिसांच्या चौकशी फेऱ्यात
पोलिसांनी सिसिलिया यांच्याकडे या हत्येसंदर्भात चौकशी केली. तेव्हा त्यांच्या बयानात अनेकदा विसंगती आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरच संशय बळावला. पोलिसी खाक्या द्याखविल्यावर सिसिलिया यांनी सत्य सांगितले. त्यांच्या पतीचे सुमारे एका वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरसोबत सिसिलिया यांचे प्रेमसंबंध जुळले होते. त्याला रोनाल्डचा कडाडून विरोध होता. त्यावरुन दोघांमध्ये कायम वादावादी व्हायची. हे प्रकरण कायमचे मिटवण्यासाठी सिसिलिया यांनी रोनाल्डच्या हत्येची सुपारी दिली होती.
पुढील स्लाईडवर वाचा...
मुंबईतील मध्य रेल्वे लोकलच्या 40 फेऱ्या वाढणार
मुंबई पोलिसांनी ऑनलाईन गंडा घालणारी नायजेरीयन टोळी पकडली
बातम्या आणखी आहेत...