आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Shazia Ilmi Playing Important Role In Celebrity Cricket League

BIGG BOSSची ऑफर नाकारून शाजिया इल्मींनी क्रिकेटच्या मैदानात घेतली उडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आम आदमी पक्षाला रामराम ठोकून शाजिया इल्मी आता राजकारणातून क्रिकेटच्या मैदानात उडी घेत आहेत. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील टीव्ही कलाकारांच्या क्रिकेट लीगमध्ये शाजिया महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यांना या स्पर्धेच्या प्रसारणाच्या होस्टची ऑफर देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली आहे.
एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार शाजियाने म्हटले आहे, 'या शोची होस्ट म्हणून माझा चेहरा बोअरिंग ठरला असता. त्यामुळे ती ऑफर मी नाकारली. या लीगमध्ये माझी भूमिका ब्रँड अॅम्बेसिडरसारखी राहाणार आहे. या स्पर्धेत माझी आर्थिक सोडल्यास इतर भागिदारी राहाणार आहे.' यापेक्षा अधिक काही सांगण्यात त्यांनी नकार दिला. अशीही चर्चा आहे, की टीव्ही रियालिटी शो 'बिग बॉस'ची देखील त्यांना ऑफर आली होती. ती त्यांनी नाकारली आहे.
सेलिब्रिटी क्रिकेट लीग
या लीगच्या आयोजनात आणखी कोण-कोण आहे, हे अजून समोर आलेले नाही. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह भारतीय उपखंडातील संघ सहभागी होतील. वेगवेगळ्या देशातील टीव्ही कलाकार या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. या लीगचे सामने दुबई आणि सिंगापूरमध्ये खेळवले जाणार आहेत.
सध्या काय करत आहे शाजिया
अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलन आणि आम आदमी पार्टीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या शाजिया इल्मी या आधी टीव्ही अँकर होत्या. आता पुन्हा एकदा त्या छोट्या पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत 'आप'चा दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता त्या महिलांवर होणार्‍या अत्याचारांवर आधारित टीव्ही शोची तयारी करत आहेत. त्याशिवाय काश्मिरमधील हिंसेचा महिलांवर होणारा परिणाम ही डॉक्यूमेंट्री तयार करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव चालू आहे. त्यासोबतच बलात्काराच्या आरोपीला केंद्रस्थानी ठेवून एक पुस्तक लिहित आहेत.
छायाचित्र - लॉर्ड देसाई आणि मैत्रिण किश्वर यांच्यासोबत लंडनमध्ये शाजिया इल्मी. हे छायाचित्र त्यांनी नुकतेच ट्विटरवर अपलोड केले आहे.