आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Woman Alleges Rape By ‘Army Officer’

मुंबई: \'डुप्लीकेट\' ऑर्मी ऑफिसरशी घटस्फोटित महिलेला दोस्ती पडली महागात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील एका 27 वर्षीय विवाहित महिलेने एका व्यक्तीवर आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून फसवणूक करीत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याबाबत संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंधेरी येथे राहणारी एका मुलाची आई व घटस्फोटित असलेल्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, 30 वर्षीय आरोपी विजयकुमार साहू या आरोपीला ऑक्टोबर 2012 मध्ये मॅट्रिमॉनियल साईटद्वारे भेटली होती. त्यावेळी आरोपीने आपण आसाममध्ये भारतीय लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले होते.

एका प्रायवेट फर्ममध्ये काम करणा-या या पीडित महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, डिसेंबर 2012 मध्ये मी साहूला भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यावेळी साहूने लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी 2013 मध्ये साहू तिला आपल्या कुटुंबातील एका लग्नसमारंभाला घेऊन गेला. त्यानंतर महिन्याभरानंतर साहू मी दिल्लीत घर खरेदी करीत आहे. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत असे सांगून माझ्याकडील 6 लाखांचे दागिने घेऊन गेला.

अश्लिल छायाचित्रे लीक करण्याची दिली धमकी- पोलिसांनी सांगितले की, महिलेला साहूच्या बॉ़डी लॅंग्वेज आणि व्यवहारावरून संशय येऊ लागला होता. मात्र तरीही ती त्याला भेटत राहिली. काही दिवसानंतर संबंधित मगिलेला हसीसिंह बिष्ठ नावाच्या महिलेने फोन केला व मी साहूची पत्नी असल्याचे सांगितले. त्या महिलेने सांगितले की साहूशी माझे भांडण झाले आहे. कारण त्याला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे. मात्र मी त्याच्यासमवेतच राहू इच्छिते. पीडित महिलेने जेव्हा साहूला याबाबत विचारणा केली तेव्हा त्याने तिला धमकी दिली व नातेसंबंध तोडून टाकेन अशी धमकी दिली. जर सारखा फोन केला तर खासगी अश्लिल छायाचित्रे लीक करेन. आरोपी साहूने नंतर पीडित महिलेच्या घरी जाऊन धमकी दिली. या घटनेची चौकशी करणा-या पोलिस अधिका-यांनी सांगितले की, आरोपी साहूची ओळख काढण्याचे काम सुरु आहे. आरोपीचे खरे नाव काय आहे याची माहिती घेऊन लवकरच त्याला ताब्यात घेऊ असे पोलिसांनी सांगितले.