आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सख्‍ख्‍या भावाकडून बहिणीवर अत्‍याचार, मुलाला जन्‍मही दिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील एका युवकाने आपल्‍या सख्‍ख्‍या बहिणीवर सातत्‍याने लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यातून दिला दिवस जाऊन तिने एका मुलाला जन्‍म दिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
असा उघडकीस आला प्रकार
पीडित मुलगी 16 वर्षांची असून, ती दोन वर्षांची असतानाच तिच्‍या वडिलांचे निधन झाले. तिला मोठा भाऊ आहे. त्‍याचे वय 18 वर्षे आहे. या दोघांची आई धुणीभांडी करते. तर आरोपी भाऊ शहरात केटरिंगचा व्यावसाय करतो. दरम्‍यान, गतवर्षी त्‍यांची आई गावाला गेली. त्‍यावेळी मुलीच्‍या भावाने तिच्‍यावर अत्‍याचार केला. पुढे त्‍याने तिला धमकी देऊन तो वारंवार अत्‍याचार करत राहिला. दरम्‍यान, तिला दिवस गेले. बदनामीपोटी आईने ही बाब लपवून ठेवली. तसेच मुलीला प्रसूतीसाठी औरंगाबादला नेले. औरंगाबादमध्ये 17 सप्टेंबरला पीडित मुलीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर या माय-लेकी एका अनाथ आश्रमात गेल्‍या. तिथून या प्रकरणाचे बिंग फुटले.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करा...