आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : अकोल्‍यात सरपंचाच्‍या पुतण्‍याने केला ग्रामपंचायत सदस्‍याचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर (अकोला) - दोन भावांमध्ये शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याची सरपंच महिलेच्या पुतण्याने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील तुरखेड येथे २४ जुलैच्या रात्री ११.३० वाजता घडली. तुरखेड येथे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सरपंच महिलेचा पुतण्या दिनेश साहेबराव खंडारे व त्याचा भाऊ विनोद खंडारे यांच्यामध्ये शेतीच्या जुन्या वादातून भांडण सुरू होते. या वेळी ग्रामपंचायत सदस्य या नात्याने विलास हरिभाऊ बडे वय ४५ हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता दिनेश खंडारे याने पाठीमागून येऊन कुऱ्हाडीने विलास बडेच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. जखमी अवस्थेत विलास बडेला उपचारासाठी मूर्तिजापूर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अकोला येथे पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, विलास बडे यांचा अकोला येथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा