आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : तरुणीला मारहाण, ४८ तासांत अहवाल सादर करा - मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येथील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्‍या एका युवतीला महिला पोलिसांनी गराडा घालत बेदम मारहाण केली. दरम्‍यान, या प्रकरणी पोलिसांनी 48 तासांत अहवाल सादर करावा, असा अल्‍ट‍िमेटम मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. डीसीपी अशोक दुधे हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नेमके काय घडले?
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मीरा रस्‍त्‍यावरील एक तरुणी आपल्‍या कुटुंबासह‍ आली होती. दरम्‍यान, तिने व्‍हीआयपी रांगेत घुसण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे पोलिसांनी तिला 1 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, हे प्रकरणच येथेच थांबले नाही. यावरून पोलिस आणि तरुणीमध्‍ये वाद झाला. पोलिसांनी तिला आणि तिच्‍या कुटुंबियांना बेदम मारहाण केली.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्किल करा...