आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : पती गावी गेल्‍याने मुलींचा गळा आवळून आईची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
नवी मुंबई - आपले न ऐकता पती मतदानाला गावी गेल्‍याने एका गुजराती महिलेने आपल्‍या दोन चिमुकल्‍या मुलींना गळफास देऊन स्‍वत: आत्‍महत्‍या केली. ही दुर्दैवी घटना कोपरखैरणे येथील सेक्टर 19 मधील हरी प्रिया इमारतीत आज (बुधवार) उघडकीस आली. जागृती हिरजी वाविया (30) असे त्‍या कैदासिनेचे नाव आहे.
अशी घडली घटना
कोपरखैरणे येथील सेक्टर 19 मधील हरी प्रिया इमारतीत वाविया हे गुजराती कुटुंब वास्तव्यास आहे. दरम्‍यान, गुजरातमध्‍ये स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणुकांसाठी मतदान झाले. या मतदानासाठी आपल्‍या आणि मुलींना घरी एकटे सोडून पती हिरजी यांनी जाऊ नये, असे जागृती हिला वाटत होते. पण, हिरजी याने जागृतीचे काहीही एक ऐकले नाही. त्‍यामुळे जागृतीने रागाच्‍या भरात राहत्या घरी घृविया (वय पाच) आणि वंशिका (दीड वर्षे) या स्वत:च्या दोन चिमुकल्या मुलींना गळफास देऊन स्वत: आत्महत्या केली.
भावाला केला होता कॉल
आपण आत्‍महत्‍या करणार आहोत, असे तिने आपला भाऊ दिनेश दया गोठी याला फोन करून सांगितले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पुढील स्‍लाइडवर वाचा,
>> पुण्‍याजवळ टॅक्‍ट्रर आणि टोयाटोची धडक, एका वाहनाने घेतला पेट
>> मुंबईतील आनंदनगर एमआयडीसीत भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान