आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Balasaheb Thackeray Property

बाळासाहेबांच्या संपत्तीत जयदेव यांना वाटा नाहीच! किती आहे शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेत मुलगा म्हणून हक्कानुसार वाटा मिळावा, अशी मागणी करणारा जयदेव ठाकरे यांचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला. या कोर्टासमोर केवळ मृत्युपत्रासंबंधी सुनावणी होऊ शकेल. त्यामुळे जयदेव यांचा अर्ज विचारात घेतला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती आर.डी. धानुका यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. अशा कोर्टांमध्ये मृत्युपत्राच्या सत्यतेसंबंधी सुनावणी होते. वडिलांच्या मृत्युपत्रात नमूद मालमत्ता प्रमाणित करून ती आपल्याकडे सोपवावी, अशी विनंती याचिका उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टात दाखल केली होती. यावर जयदेव यांनी कॅव्हेट दाखल केले.
14.85 कोटींची मालमत्ता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात 14.85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वाधिक वाटा उद्धव यांनाच दिला आहे. महिन्यापूर्वी जयदेव यांनी कुटुंबाच्या नावे असलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यास कोर्टाने बंदी घालावी, अशी मागणी हायकोर्टात केली होती. मात्र, ती पण फेटाळण्यात आली होती.

पुढील स्लाइडमध्ये, का आहे मृत्युपत्रावरुन वाद