आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Heavy Rain In Mumbai Thane

मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस, लोकल रेल्वेसह रस्ते वाहतूक धिम्यागतीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई-ठाण्यासह नवी मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आणि चाकरमान्यांची त्रेधा उडाली आहे. पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या चार दिवसांपासून ठाणे - कल्याण भागात पावसाने मुक्काम ठोकला आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पावस सुरु झाला. ठाणे शहर आणि डोंबिवली, कल्याण या भागातही पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे. रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे.
एस.व्ही. रोडवर अंधेरीजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. बोरिवलीकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक संथगतीने सुरु आहे. रस्त्यांवरील खड्यांचा वाहतूकीला मोठा अडथळा होते आहे.
दरम्यान, जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. पुढील सहा ते सात महिने पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाला आहे. येत्या 24 तासात जोरादार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी भातसा आणि वैतरणा ही दोन्ही धरणे भरत आली आहेत. तर, मोडक सागर, तानसा पूर्ण भरले आहेत.