आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Rakhi Sawant Form News Patry Symol Green Chilli

राखीने चोरला केजरीवालांचा अजेंडा, स्थापन केली \'राष्ट्रीय आम पार्टी\'; सर्वत्र उडाली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयटम गर्लच्या प्रतिमेत अडकलेली आणि गंभीर भूमिका मिळविण्यात अपयशी ठरलेल्या राखी सावंतने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्यानंतर राखीला मुंबईतून खासदारकीच्या तिकीटाची आपेक्षा होती. मात्र, तिची आपेक्षा फोल ठरल्यानंतर तिने राष्ट्रीय आम पार्टी स्थापन केली आहे. तिच्या पक्ष स्थापनेचा उद्देश खासदारांना 'गाढ झोपेतून जागे करणे' आणि लोकांच्या समस्या गांभीर्याने समजून घेण्यास भाग पाडणे, असल्याचे तिने सांगितले आहे.
राखीने आज (शनिवार) उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ती म्हणाले, 'मी झोपी गेलेल्या खासदारांना जागे करणार आहे.'
बोलघेवडेपणासाठी ओळखली जात असलेली राखी सावंत म्हणाले, 'मी आता अनाथ नेता नाही आणि अपक्ष उमेदवार देखील नाही. मी माझा पक्ष स्थापन केला असून मी पक्षाची उपाध्यक्ष आहे. लवकरच आमच्या पक्षाचे घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात येईल. मला गरीबांची सेवा करायची आहे. महिलांची सुरक्षा आणि त्यांचे समाजातील स्थान उंचवायचे आहे.'
राखीने तिच्या पक्षाचे नाव अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या नावासोबत मिळते जुळते ठेवले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, तसेच मिळत्या जुळत्या नावाशिवाय त्यात कोणतीही समानता नाही. राखीने दावा केला, की ती रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत जनतेची सेवा करेल, आणि भ्रष्टाचाराने त्रस्त जनतेला सक्षम पर्याय देईल.
पुढील स्लाइडमध्ये, सोशल मीडियावर उडत आहे, राखीची खिल्ली