आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटक पक्षांची किटकिट आधी संपवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीतीलघटक पक्षांना अगोदर जागा देऊन नंतर शिवसेना-भाजपच्या जागांबाबत निर्णय घेण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. गुरुवारी रात्री अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे झालेल्या या बैठकीत जागावाटपासह राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांना भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांनी जास्त जागांची मागणी केल्याचे सांगितले. ही मागणी मान्य झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचे सूतोवाचही रामदास अाठवले आिण राजू शेट्टी यांनी केल्याबाबतही चर्चा झाली. घटक पक्षांनी मागितलेल्या जागा दिल्या तर शिवसेना-भाजपच्या वाट्याला काहीच राहणार नाही, त्यामुळे घटक पक्षांच्या जागांबाबत गंभीरपूर्वक विचार करावा असे भाजप नेत्यांच्या म्हणणे होते. तर घटक पक्षांच्या दबावाखाली येण्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र सध्या आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे असल्याने सगळ्यांना एकत्र घेऊन चालले पाहिजे, असे अमित शहा म्हणाल्याचे समजते. त्यामुळे घटक पक्षांच्या जागांवर अगोदर चर्चा करून त्यांना योग्य त्या जागा दिल्या जाव्यात, असा सूर बैठकीत निघाला.

पुढील आठवड्यात बैठक
शिवसेना,भाजप आपल्या कोट्यातून किती जागा मित्रांना देऊ शकतील, कोणत्या जागांची अदलाबदल करायची याचा निर्णय घेतल्यानंतरच अंतिम जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होईल.
निवडून येणाऱ्याच जागा द्या : छोट्याघटक पक्षांची ताकद पाहून अगोदर त्यांच्या जागांबाबत चर्चा करावी. जेथे त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्याच जागा देण्याबाबत चर्चा झाली आिण त्या जागा सोडून उरलेल्या जागांबाबत शिवसेना-भाजप नेत्यांनी चर्चा करावी, असेही या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये, जागावाटपात भाजपचा नवा फॉर्म्युला