आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Mumbai: One Person Shot At In Mumbai Local Train

किरकोळ वादातून मुंबईत लोकलमध्‍ये तरुणावर गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनवरुन अंबरनाथला चाललेल्या लोकलमध्ये नाहूर स्टेशनजवळ एका व्‍यक्तीवर गोळीबार झाला. तबरेज जेठवा नावाच्‍या प्रवाशावर हा गोळीबार करण्‍यात आला होता. त्‍यात तो जखमी झाला आहे. किरकोळ वादातून ही घटना घडली आहे.

तबरेज हा एका बिल्डरकडे ड्रायव्हरची नोकरी करतो. रात्री तो अंबरनाथ लोकलमध्ये सामानाच्‍या डब्‍यात बसला. याच डब्यात बसलेल्या चार जणांशी त्याचा वाद झाला. चौघांपैकी कोणाचा तरी त्‍याच्‍या पायावर चुकून पाय पडला. याच वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. चौघांनी त्‍याला नाहूरला पाहून घेतो, अशी धमकी दिली होती. नाहुरला त्‍यांनी त्‍याच्‍यावर गोळ्या झाडल्‍या आणि स्‍थानकावर उतरून पसार झाले.

जखमी तबरेजला आधी मुलुंड येथील अग्रवाल रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. तेथून त्‍याला सायन रुग्‍णालयात नेण्‍यात आले. याप्रकरणी रेल्‍वे पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.