आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Raj Thackeray Toll Issue At Maharashtra

राजना अटक होण्याची शक्यता कमीच, मनसे प्रमुख आज पुणे दौऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, राज ठाकरेंना अटक होणार नसल्याची माहिती सुत्रांना दिली आहे. राज ठाकरे यांना अटक झाली तर ते प्रसिद्धीच्या झोतात येतील. त्यांच्या अटकेनंतर मनसे कार्यकर्ते राडा करुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज यांना पुणे दौर्‍यात अटक होण्याची शक्यता कमी असल्याचे सुत्रांनी सांगितले.
राज्यात सुरु असलेल्या टोलवसुली विरोधात राज ठाकरेंच्या आदेशावरून मनसे कार्यकर्त्यांनी 'टोल'फोड करून कायदा हातात घेतला होता. या टोलविरोधी आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकत्यांवर पुणे जिल्ह्यातील राजगड आणि लोणी काळभोर येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज यांना गुरुवारी किंवा शुक्रवारी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आजपासून राज पुणे दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान त्यांना अटक होईल, असे सांगितले जात होते.
राज यांच्याविरोधात दंगल घडवणे, अशांतता निर्माण करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप आहे.