आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : पोलिसांच्या समोरच \'भाजयुमो\'च्‍या पदाधिकाने जाळली कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमित ठाकूर - Divya Marathi
सुमित ठाकूर
नागपूर - सत्‍तेत येताच भाजपमधील गुंड प्रवृत्‍ती असलेल्‍या काही कार्यकर्त्‍यांना माज चढला असल्‍याचे नागपूरमधील प्रकारातून आज (शुक्रवार) उघड झाले. भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर उपाध्‍यक्ष सुमित ठाकूर याने चक्‍क पोलिसांसमोर शेजारच्या प्राध्यापकाच्या कारला पेटवून दिले. दरम्‍यान, गिट्टीखदान पोलिसांनी त्‍याच्‍या वडिलांना चौकीसाठी ताब्‍यात घेतले आहे.
अशी घडली घटना
प्रेरणा कॉलनीत राहणारे प्रा. मल्हारी मस्के (वय ५०) यांच्‍या घराशेजारी त्‍यांच्‍या सासू तथा सेवानिवृत्‍त मुख्‍याध्‍यापिक जिजाबाई जाधव आणि सुमित ठाकूर याचेही घर आहे. दोन दिवसांपूर्वी सुमित हा घरातून कार काढत असताना त्याने प्रा. मल्हारी मस्के यांच्या गाडीला धडक दिली. दरम्‍यान, तोच प्रा. मस्के यांना नुकसान भरपाई मागू लागला. प्रा. मस्के यांनी चूक नसल्याने नुकसान भरपाई देण्यास मनाई केली. त्‍यावर सुमितने त्यांना आणि त्यांच्या सासुंना शिविगाळ करून आणि मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर प्रा. मस्के यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस शिपाई तैनात केले.
पोलिसांसामोर जाळली गाडी
आज (शुक्रवार) पहाटे 3 वाजताच्‍या सुमारास सुमित याने मस्‍के यांच्‍या घरासमोर उभी असलेली बेलोरो कार जाळली. हा प्रकार सुरक्षेसाठी तैनात असलेल्‍या दोन पोलिसांसमोर घडला.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्सवर क्किल करा...