आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lawyer Majid Memon File Nomination For Rajyasabha From Ncp

NCPकडून राज्यसभेसाठी पवार व माजिद मेमन, शुक्रवारी अर्ज भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या 7 फेब्रुवारीला राज्यसभेच्या सात जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागांसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. माजिद मेमन अर्ज दाखल करणार आहेत. येत्या शुक्रवारी (24 जानेवारी) हे दोघे मुंबईत अर्ज सादर करतील. पवार यांचे नावे दोन दिवसापूर्वीच पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र दुस-या जागेसाठी काही नावे पुढे येत होती. मात्र आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजिद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
माजिद मेमन यांच्याबरोबर मंत्री फौजिया खान, नवाब मलिक, गोविंदराव अदिक यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र, मलिक व फौजिया खान सध्या विधान परिषदेत प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांची नावे चर्चेत येऊनही मागे पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार फौजिया खान यांच्यासाठी आग्रही होते. यामागे एका महिला व मुस्लिम चेहरा अशी त्यामागे त्यांची भूमिका होती. मात्र, पक्षासाठी गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या मेमन यांना उमेदवारी देण्याचा दिल्लीतील बैठकीत निर्णय झाला. मेमन सध्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. मेमन यांनी 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट व दंगलीबाबतच्या खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
पुढे वाचा, फौजियांचे नाव कसे पडले मागे...