आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा: मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर जान्हवी आयरिश पबमध्ये गेली होती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- जान्हवी गडकर - Divya Marathi
फाईल फोटो- जान्हवी गडकर
मुंबई- मुंबईतील कॉर्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने दोघांचा बळी घेतल्यानंतर याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. जान्हवीच्या वैद्यकीय तपासणीत हे आढळून आले आहे की, तिने प्रमाणापेक्षा जास्त दारू घेतली होती व तिच्या रक्तात अल्कोहोलचे जे प्रमाण सापडले जे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवीच्या रक्तात 200 मिलीग्रॅम अल्कोहोल आढळून आले आहे. याची मर्यादा प्रत्येक 100 ग्रॅम रक्तात 30 मिलीग्रॅम इतके आहे. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी जान्हवीच्या विरोधात इतर काही ठोस पुरावे मिळाल्याचे म्हटले आहे. जान्हवी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीत लीगल डिपार्टमेंटमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम करीत आहे.
मुंबई पोलिसाच्या एका पथकाने गुरुवारी कुलाब्यातील आयरिश हाऊस पबमध्ये जाऊन चौकशी केली. जान्हवी मरीन प्लाजा हॉटेलमध्ये दारू पिऊन येथे आली होती. तिने येथेही दारू पिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी जान्हवी येथे किती दारू प्याली याची माहिती घेतली. पोलिसांनी सांगितले की, जान्हवी आयरिश पबमध्ये गेल्याचे समोर आले आहे व तेथून बिलही घेतले आहे. जान्हवीने पोलिसांना केवळ दोन हजार रूपये बिल भरल्याचे सांगितले मात्र तिने साडेचार हजार क्रेडिट कार्डने भरल्याचे समोर आले आहे. मित्रांबरोबर पार्टी केल्यानंतर जान्हवी आयरिश पबमध्ये गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले. पोलिसांना तो मदत करीत आहे. पोलिस आता आयरिश पबमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवत आहेत. आयरिश पबमध्ये दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळताच जान्हवीविरोधात आणखी फास आवळला जाणार आहे.
पोलिसांना देतेय चुकीची माहिती-
सोमवारीच्या मध्यरात्री जान्हवीने दारूच्या नशेत आपली ऑडी क्यू-3 कारद्वारे काही लोकांना टक्कर मारली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी आहेत. जान्हवीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते की, तिने केवळ दोन पेग व्हिस्की घेतली होती. मात्र, वैद्यकीय रिपोर्टमध्ये तिने 6 पेग घेतल्याचे समोर आले आहे. याचबरोबर मरीन प्लाझा हॉटेलातून दहा वाजता बाहेर पडल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे दारू जास्त झाल्याने सामान्य होण्यासाठी कारमध्येच दोन घालवल्याचे तिने सांगितले होते. मात्र, या दोन तासाच्या काळात जान्हवी आयरिश पबमध्ये गेल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यात जान्हवीचा दोस्त राहुल दत्ता याचा समावेश आहे. ज्याच्यासोबत ती दारू प्याली होती. जान्हवीला कंपनीकडून बोनस इन्सेंटिव मिळाला होता व त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांनी पार्टी केली होती.
कोण आहे जान्हवी गडकर-
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम करते. तसेच जान्हवी रिलायन्स कंपनीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. जान्हवी चेंबूर परिसरात राहत असून रिलायन्स कंपनीच्या लीगल सेलवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
कधी आणि कसा झाला अपघात...
10.30 PM: मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर जान्हवी आपल्या Audi Q3 या कारने हॉटेलातून बाहेर पडली. यावेळी तिने 6 पेग रिचवले होते.
11.45 PM: जान्हवी मित्र राहुल दत्ता व शैलेंद्र राणे यांच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्यांना बाय बाय करून थेट आयरिश पबमध्ये गेली. तिथे ती दीड ते पावनेदोन तास होती. आयरिश पबमध्येही जान्हवीने दारू डोसली.
12.55 AM: दारूच्या नशेत असलेली जान्हवी ताशी 120 च्या वेगाने ऑडी कार चालवत होती. ईस्टर्न फ्री वेवर विरुद्ध दिशेने भरधाव ऑडी कार चालवू लागली. अपघातापूर्वी जान्हवीने सुमारे 11 किलोमीटर चुकीच्या दिशेने प्रवास केला.
12.58 AM: डॉकयार्ड रोडवर दोन मारूती स्विफ्ट कारला धडक देता-देता वाचली.
12.58 AM: या वाहनचालकांनी तिचा पाठलाग केला; मात्र भरधाव वेगात असल्याने तिला गाठता आले नाही.
1.10 AM : जान्हवीच्या कारने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. टॅक्सी चालक सय्यद हुसेन पांजरपोळ टनेलपासून सबुनवाला कुटुंबियांना घेऊन चालले होते.
1.20 AM : जेव्हा अपघात झाला तेव्हा पाठीमागून पाठलाग करणारी मारूती स्विफ्ट गाडी तेथे हजर झाली, जे लोक जान्हवी पाठलाग करीत होते.
1.30 AM : ऑडी आणि ओम्नी टॅक्सीची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ऑडी कारचे टायर फाटले, इंजिनचा काही भाग तुटला. हा अपघात इतका भीषण असतानाही ऑडीतील जान्हवीला खरचटलेदेखील नाही. ऑडी टॅक्सीला धडकताच कारमधील अपघातविरोधी एअर बलून फुगले आणि जान्हवी बचावली मात्र आत अडकून राहिली. लोकांनी तिला बाहेर काढले.
1.45 AM : जान्हवीला चेंबूरमधील आरसीएफ पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
2.15 AM : नशेत चुर्रर झालेली जान्हवी पोलिस स्टेशनमधील महिला सेलमध्ये झोपी गेली.
6.45 AM : जान्हवी जेव्हा उठली तेव्हा तिच्या लक्षात आले की पोलिस ठाण्यात आहे. तेव्हा ती रडू लागली. तिने हॅंगओव्हरची तक्रारही केली.
9.30 AM : पोलिसांनी आरोपी जान्हवीचा जबाब नोंदवला.
पुढे वाचा, जान्हवीवर कोणत्या-कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे...