आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxman Jagtap News In Marathi, MLA, Raj Thackeray, Divya Marathi

लक्ष्‍मण जगताप यांचा आमदारकीचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मावळमधून शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी आमदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान, शेकापच्या मावळ व रायगडमधील उमेदवारांना मनसेने पाठिंबा दिला असून त्यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत.


शेकापने मावळमधून अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना व रायगडमधून राष्‍ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना रिंगणात उतरवले आहे. जगताप व कदम यांनी गुरुवारी राज ठाकरे यांची घेऊन पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. राज ठाकरेंना आपण प्रचारासाठी आमंत्रित केले असून त्यांनी दोन ते तीन सभा घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे जगताप यांनी पत्रकारांना सांगितले.


राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ‘हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मगच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवा,’ असे आव्हान लक्ष्मण जगताप यांना दिले होते. हे आव्हान स्वीकारून जगताप यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पाठविला आहे.